Last Updated: Saturday, February 15, 2014, 15:34
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादआदर्श घोटाळ्यानंतर जणू नांदेडपर्यंतच मर्यादित राहिलेले अशोक चव्हाण आता निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा रिंगणात उतरले आहेत.. ब-याच महिन्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी नांदेड सोडून औरंगाबादमध्ये दोन सभा घेतल्या. त्यांच्या देहबोलिवरून आता अशोच चव्हाण पुन्हा जोमाने दंड थोपटून राजकारणार परतणार अशीच चिन्हं दिसत आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून शांत असलेले अशोक चव्हाण औरंगाबादच्या एका सभेत असे बरसले.. आदर्श घोटाळ्यानंतर चव्हाण नांदेड पुरतेच राहिले होते.. जिल्ह्याबाहेर सभा घेणे वा काँग्रेसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सुद्धा त्यांनी टाळले, मात्र आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलाय.. त्यामुळे निवडणुकींच्या रिंगणात पुन्हा मुसंडी मारत चव्हाण सक्रीय राजकारणात परतणार अशीच चिन्हं दिसत आहेत.
औरंगाबादेत तर त्यांनी एकाच दिवसात तीन कार्यक्रमांचा फडशा पाडला.प्रत्येक सभेत मराठवाड्यावर कसा अन्याय होतोय हेच त्यांच्या भाषणातून दिसत होत. अनेक दिवसांपासून बरंच दडवलेलं चव्हाणांच्या भाषणातून बाहेर पडत होतं.
भाषणातून कुठलीही जबाबदारी स्विकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली मात्र कुठली जबाबदारी नेतृत्वाने दिलीय का, या प्रश्नावर बोलतांना काँग्रेसचा कार्यकर्त्याला जबाबादारीची गरज नाही काम करीत राहणार असे स्पष्टीकरणही त्यांनी दिल. एक मात्र खऱं निवडणुकांच्या तोंडावर झाले गेले विसरून चव्हाण कामाला लागले आहे.. आणि त्यांची आक्रमकता पाहता चव्हाण परतले असे दिसत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 15, 2014, 13:51