काँग्रेसचे झांबड विजयी, सेनेने औरंगाबादचा गड गमावला, Aurangabad - Jalna Legislative Council elections

काँग्रेस विजयी, सेनेने औरंगाबादचा गड गमावला

काँग्रेस विजयी,  सेनेने औरंगाबादचा गड गमावला
www.24taas.com , झी मीडिया, औरंगाबाद

औरंगाबाद - जालना विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा गड कोसळलाय. काँग्रेसचे सुभाष झांबड निवडणुकीत विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेच्या किशनचंद तनवाणींचा ७२ मतांनी पराभव केलाय.

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा आमदार कोण असेल याचा फैसला आज झाला. सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी चार टेबल ठेवण्यात आली होती तर ५० कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत झाली होती. शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी मिळाली होती तर काँग्रेसकडून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मनसेने काँग्रेसला साथ दिल्यामुळे काँग्रेसची बाजू वरचढ होती. याचाच फायदा काँग्रेसला झाल्याचे दिसून येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.


पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, August 21, 2013, 13:07


comments powered by Disqus