लाचखोर गजानन खाडेचं २ कोटींपेक्षा जास्त घबाड Aurangabad - PWD officer Gajanan Khade`s police custody upto 21

लाचखोर गजानन खाडेचं २ कोटींपेक्षा जास्त घबाड

लाचखोर गजानन खाडेचं २ कोटींपेक्षा जास्त घबाड
www.24taas.com , झी मीडिया, औरंगाबाद

औरंगाबादेतील लाचखोर अधिकारी गजानन खाडेला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. तर दुसरीकडे खाडेच्या संपत्तीचा आकडा वाढतच चाललाय. दुसऱ्या दिवशी गजानन खाडेच्या संपत्तीची मोजदाद सुरुच होती. आत्तापर्यंत खाडेकडे जवळपास २ कोटींची संपत्ती सापडलीय.

चौकशीदरम्यान खाडेकडे औरंगाबाद जवळच गेवराई बाभुळगाव शिवारात १० एकर शेती असल्याचं उघड झालंय. या शेतीची किंमत कमीत कमी १० लाख रुपये आहे. शिवाय वाशीम जिल्ह्यातही १० एकर शेती असल्याचं तपासात उघड झालंय. एवढंच नाही तर औरंगाबादेत खाडेचे १७ भूखंड आहेत. त्यामुळं बांधकाम विभागातील या दुसऱ्या चिखलीकरची संपत्ती डोळे दिपवणारी आहे.

लाचलुचपत विभाग अजूनही त्याच्याकडे किती संपत्ती आहे याचा शोध घेतेय. दोन दिवसांपूर्वी खाडेलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ५० हजाराची लाच घेताना पकडलं होतं. त्यावेळीही त्याच्या घरी टाकलेल्या छाप्यात ३१ लाख रुपये रोख, सव्वा किलो सोनं, एक किलो चांदी, जमिनींच्या करोडोंच्या व्यवहाराची कागदपत्रं सापडली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 19, 2013, 12:44


comments powered by Disqus