Last Updated: Friday, October 12, 2012, 12:24
www.24taas.com, जालनाहे चित्र सत्यात यावं अशी तमाम मराठी माणसांची इच्छा असल्याचे अनेक पोस्टर आपण पाहिले आहेत. पण आता मात्र खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: ही इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.
2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं मिळून सत्ता स्थापन करणार असून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच असतील, असा दावा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. मनसेसोबत असावी, ही साहेबांची इच्छा आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनसे-सेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्टाचारावर त्यांनी या वेळी तोफ डागली. सोनिया गांधी, त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा, छगन भुजबळ, पाचपुते, दर्डा घोटाळ्यात अडकलेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
First Published: Friday, October 12, 2012, 12:12