अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, १०० जणांना चावा, bee attack in buldana

अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, १०० जणांना चावा

अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, १०० जणांना चावा
www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात वडगाव वान या गावातल्या एका अंत्ययात्रेवर जवळजवळ ३०० जणांवर मधमाशांनी भयंकर असा हल्ला केला.

वडगाव वान या गावातील रहिवासी शामराव माळेकार यांच्या अंत्ययात्रेत जवळपास ३०० हून अधिक जण सहभागी झाले होते. त्यावेळी रस्त्यातल्या एका झाडावरच्या मधमाशांच्या मोहोळानं अंत्ययात्रेवर अचानक हल्ला केला. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले लोक घाबरले आणि पळाले. पण, मधमाशांनी मात्र जवळपास १०० जणांचा चावा घेतला. या घटनेत ८ ते १० जण गंभीर जखमी झालेत.

मधमाशांनी हल्ला करताच गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यातच सोडून पळ काढला होता... मात्र माश्या शांत झाल्यावर परतलेल्या ग्रामस्थांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 26, 2014, 17:33


comments powered by Disqus