रेडिओ स्फोटातील जखमींची प्रकृती चिंताजनक, beed radio blast

रेडिओ स्फोटातील जखमींची प्रकृती चिंताजनक

 रेडिओ स्फोटातील जखमींची प्रकृती चिंताजनक
www.24taas.com,मुंबई

बीडच्या रेडिओ स्फोटात जखमी झालेल्या चौघांचीही प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगीतलंय. या चौघांवर मुंबईच्या जे.जे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्फोटात चौघांना ब-याच जखमा झाल्या असून दिवसभरात त्याच्यावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

बीड रेडिओ पार्सल स्फोटाचा अखेर उलगडा झालाय. या प्रकरणी पोलिसांनी आबा ऊर्फ राजाभाऊ गिरी या आरोपीला अटक केलीय.गोपीनाथ तरकसे या केज तालुक्यातल्या व्यक्तीला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी गिरीने हा रेडिओ पार्सलचा डाव आखला होता. त्याचा हा डाव तो रेडिओ घरी घेऊन जाणा-या बसचे वाहक निंबाळकर यांच्या अंगलट आला.

या रेडिओ स्फोटासाठी गिरीने विहिरीत वापरण्यात येणा-या स्फोटकांचा वापर केला होता. औरंगाबाद विभागाचे पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार यांनी ही माहिती दिलीय.

First Published: Monday, December 3, 2012, 11:33


comments powered by Disqus