24taas.com- before 6th month vilsarao will

विलासरावांचे मृत्यूपत्र सहा महिन्यापूर्वीच होते तयार...

विलासरावांचे मृत्यूपत्र सहा महिन्यापूर्वीच होते तयार...
www.24taas.com, लातूर

विलासराव देशमुख यांना रूग्णालयात दाखल करून काही दिवस होत नाही तोच ते हे जग सोडून गेले. विलासराव यांचे निधन साऱ्यांनाच धक्कादायक होते. मात्र विलासरावांना त्याची चाहूल आधीच लागली होती. आणि त्यामुळेच त्यांनी ६ महिन्यापूर्वीच स्वत:चे मृत्यूपत्र तयार करून ठेवले होते. त्यांच्या लिव्हरमध्ये गाठ असल्याचे त्यांना १५ महिन्यांपूर्वीच माहित झाले होते. याच गाठीचे रुपांतर पुढे लिव्हर कॅन्सरमध्ये झाले.

मुंबईच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर नियमीत उपचार केले जात होते. ते हॉस्पिटलमध्ये जातांना पत्रकारांना सांगत, `आता मी म्हातारा झालो आहे. रुटीन चेकअपसाठी आलो आहे. पण सत्ताधारी पक्षाची प्रकृती उत्तम आहे`, असे म्हणत ते हसत निघून जात.

त्यांना त्यांच्या आजाराची कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी सहा महिन्यांपूर्वी मृत्यूपत्र तयार करुन ठेवले होते. त्यात त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची नोंद करण्यात आलेली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार त्यांनी मृत्यूपत्रात मुले आणि पत्नी यांच्यामध्ये सर्व संपत्ती, जमीन आणि व्यवहारांचीही वाटणी केलेली आहे.

रितेश आणि जेनेलिया डिसुजाच्या लग्नाला कुटूंबातील काही सदस्यांचा काहीसा विरोध होता. मात्र, तरीही विलासरावांनी या दोघांचे लग्न लवकर उरकण्याचा आग्रह धरला होता.

First Published: Wednesday, August 15, 2012, 14:22


comments powered by Disqus