Last Updated: Thursday, October 11, 2012, 17:21
www.24taas.com, औरंगाबादमुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जमिन द्यावी, अशी मागणी बिहारचे आरोग्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केलीये. बिहारमधून मोठ्या प्रमाणात लोक कँन्सरच्या उपचारासाठी येतात, त्यामुळे या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बिहार भवन बांधण्याचा प्रस्ताव आरोग्यमंत्री अश्विनिकुमार चौबे महाराष्ट्र सरकारपुढे ठेवणार आहेत.
यासाठी ते राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसह मुंख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत.. वेळप्रसंगी रुग्णांसाठी महाराष्ट्रातील लोकांचे पाय धरायला सुद्धा आपण तयार आहोत अशी भूमिका त्यांनी मांडलीये.
बिहार भवनाचे बांधकाम बिहार सरकारच करेल राज्याने फक्त जागा द्यावी अशी मागणी त्यांनी केलीय..मनसेनं मात्र याला विरोध दर्शवलाय.
First Published: Thursday, October 11, 2012, 17:03