आणखी एक `प्रिन्स` बोअरवेलमध्ये!, boy falls in bore well in jalgaon

आणखी एक `प्रिन्स` बोअरवेलमध्ये!

आणखी एक `प्रिन्स` बोअरवेलमध्ये!
www.24taas.com, जळगाव

जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या तांदळी गावातील तीन वर्षाचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडलाय. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडलीय. त्याला वाचवण्यासाठी अद्यापही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

भटू धनगर असं या चिमुकल्याचं नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तो खेळता खेळता ४०० फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये ४० फूटावर अडकून पडला. त्याचा श्वास गुदमरु नये, यासाठी कृत्रिम श्वासोच्छवासासाठी बोअरवेलमध्ये ऑक्सिजनही सोडण्यात आलाय. त्याला काढण्यासाठी आधी गावकऱ्यांनी निष्फळ प्रयत्न केले. मात्र, त्यानंतर प्रशासनानं सहा जेसीबीच्या मदतीने चिमुकल्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. सैन्यदलाची एक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.

First Published: Saturday, March 2, 2013, 12:09


comments powered by Disqus