चुकीचं इंजेक्शन दिल्याने दोन बालकांचा मृत्यू, Children wrong injection in Yavatmal

चुकीचं इंजेक्शन दिल्याने दोन बालकांचा मृत्यू

चुकीचं इंजेक्शन दिल्याने दोन बालकांचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

डॉक्टरची चूक दोन बालकांच्या जीवावर बेतली. हा प्रकार यवतमाळमध्ये घडलाय. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याने हॉस्पीटलमध्ये तणावाचे वातावरण होते.

यवतमाळमध्ये एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे दोन बालकं दगावलीयत. चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे कुंदन राठोड, प्रथमेश बीबेकर या दोन बालकांना आपला जीव गमवावा लागलाय.

डॉ. संजीव जोशी यांच्या रुग्णालयात ही घटना घडलीय. बालकं दगावल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरना मारहाण केली त्यामुळे चिरायू क्रिटिकेअर रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 16:00


comments powered by Disqus