Last Updated: Saturday, February 22, 2014, 16:12
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादऔरंगाबादेत काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ पहायला मिळाला. काँग्रेसच्या दोन गटांत उमेदवार निवडीवरुन हाणामारी झाली.
उत्तमसिंह पवार आणि नितीन पाटील समर्थक पक्ष निरीक्षक मुजफ्फर हुसेन आणि धोंडीराम राठोड यांच्यासमोरच भिडले.
शुक्रवारी सुद्धा गांधी भवनमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरु असताना देखील असाच प्रकार घडला होता.
अचानक कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले. त्यावेळी पक्ष निरीक्षक मुजफ्फर हुसेन चांगलेच संतापले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 22, 2014, 15:52