Last Updated: Friday, May 2, 2014, 22:01
www.23taas.com, झी मीडिया, औरंगाबाद औरंगाबाद पाझर तलाव योजनेत भ्रष्टाचार उघड झालाय. जालना जिल्ह्यातल्या पाझर तलाव घोटाळा प्रकरणी औरंगाबाद लाच-लुचपत विभागाने सिंचन विभागातल्या चार माजी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी सकाळी या अधिकाऱ्यांच्या घरावर अँन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. त्यावेळी अधिकारी रघुवीर यादव यांच्या घरी 1 किलो 700 ग्रॅम सोनं तसंच 50 लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रं सापडले. तर श्रीनिवास काळे या अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये 2 किलो सोनं सापडले असल्याची माहिती मिळतीय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खरा तर पाझर तलावाचा भ्रष्टाचार 15 लाखांचा आहे. मात्र या भ्रष्टाचाराची चौकशी करत असताना या अधिकाऱ्यांच्या घरातून मोठ घबाड सापडलंय.
व्हिडिओ पाहा - *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 2, 2014, 22:01