Last Updated: Monday, September 3, 2012, 12:56
www.24ttas.com,अमरावती पावसामुळे मंदिराची भींत कोसळून १० जण ठार झाल्याची घटना अमरावतीमधील कोंडण्यपुल येथे घडली. मुसळधार पावसामुळे भिंतीचा काही भाग कोसळला. यात २० पेक्षा जास्त लोक अडकल्याची भित व्यक्त होत आहे.
सकाळपासून अमरावतीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथील रुक्मणी मंदिराची भींत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. भींतीच्या ढिगाऱ्यात २० पेक्षा जास्त लोक अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पावसामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळा येत होता. आतापर्यंत चार मृतदेह मातीच्या ढीगाऱ्यातून गाढल्याचे सांगण्यात आले. मात्र, आणखी काही मृतदेह अडकल्याची भिती वर्तविण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत नेमका आकडा समजू शकला नाही.
First Published: Sunday, September 2, 2012, 22:49