Last Updated: Sunday, December 16, 2012, 12:06
www.24taas.com,औरंगाबादअफजल गुरूला फाशी देण्यास भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केलाय. अफझलला फाशी दिल्यास काश्मीरमधल्या दहशतवाद्यांसाठी तो हुतात्मा ठरेल, त्यापेक्षा जेलमध्ये ठेवणंच चांगलं असं आंबेडकर यांनी म्हटलंय.
अफजल गुरूला फाशी दिल्यास त्या संघटना एकत्रित येतील आणि नागरिकांनी उठाव केला तर लष्करही काही करू शकणार नाही. देशातील हिंदूंच्या तुष्टीकरणासाठी अफजल गुरूला फाशी देऊ नका. त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी पेंडिंग ठेवावा, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेय.
औरंगाबाद दौर्यालवर आल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. शहीद भगतसिंग आणि अफजल गुरू यांच्यात साम्य आहे, असे मी मानतो. भगतसिंग यांना इंग्रज आतंकवादी म्हणत होते. शेवटी इंग्रजांनी भगतसिंगांना फासावर लटकवले. आपण त्यांना शहीद म्हणतो. अफजल गुरूदेखील काश्मिरी जनतेसाठी तसेच आहेत. जर त्यांना फाशी दिली तर तेथील जनता उठाव करील. जम्मू-काश्मीर प्रदेशचे नागरिक स्वखुशीने या देशात सामील झालेले आहेत. त्यांच्याशी सन्मानाने आणि प्रेमाने वागा, असा सल्ला दिलाय.
दरम्यान, निवडणुकीनंतर येणार्याण नवीन सरकारनेदेखील अफजल गुरूंना फाशी देण्याचा विचार करू नये. फिशीचा अनर्थ ओढवून घेण्याचा प्रयत्न करू नये, असे ते म्हणाले.
First Published: Sunday, December 16, 2012, 12:06