Last Updated: Thursday, October 18, 2012, 11:46
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या लोहगावमध्ये बुधवारी एका डॉक्टरला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी करत आरोपीला अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावमध्ये अटक केलीयं.
हरिभाऊ लघाने असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली जीपही हस्तगत करण्यात आलीये. शेतीच्या वादातून डॉ. विठ्ठल लघाने यांची हत्या केल्याची आरोपीने प्राथमिक चौकशीत कबुली दिलीयं. डॉ. लघाटे हे औरंगाबादजवळील बिडकीन गावचे रहिवासी होते. मोटरसायकलवरून लोहगावला जात असताना लोहगाव-ढाकेफळ रस्त्यावर समोरून येणाऱ्या एका जीपने त्यांना टक्कर मारली आणि त्यानंतर जीपमधून काही लोकांनी लघाने यांना लाठ्याकाठ्यांनी मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून हल्लोखोरांनी त्यांना जिवंत पेटवून दिले.
औरंगाबाद जि.प.चे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील लघाने यांचे ते धाकटे बंधू होते. व्यवसायाने डॉक्टर असलेले विठ्ठलराव यांचा वाळूजजवळील शेंदुरवादा येथे खासगी दवाखाना होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
First Published: Thursday, October 18, 2012, 11:46