मुली होत असल्याने डॉक्टरने पत्नीला लावला गळफास, Doctor husband had killed his wife

मुली होत असल्याने डॉक्टरने पत्नीला लावला गळफास

www.24taas.com, नांदेड

मुली होतात म्हणून पतीनं पत्नीला गळफास लावून ठार केल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय. हदगाव तालुक्यातल्या निवाघा बाजार गावात काल संध्याकाळी ही घटना घडलीय.

दोन मुली झाल्यानं पतीनं पत्नीची हत्या केलीय. विशेष म्हणजे हा पती पेशाने डॉक्टर आहे. मृत महिलेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीसह सासरच्या पाच जणांना अटक केली आहे.

या घटनेनंतर परिसरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.डॉक्टरने पत्नीला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

First Published: Sunday, October 14, 2012, 23:54


comments powered by Disqus