मद्यधुंद तरूणी बॉइज होस्टेलवर मुक्कामी, drunk girl dancing at Boys Hostel

मद्यधुंद तरूणी बॉइज होस्टेलवर मुक्कामी

मद्यधुंद तरूणी बॉइज होस्टेलवर मुक्कामी
www.24taas.com, अमरावती

मुंबईत राहणाऱ्या सध्या अमरावतीत शिक्षण घेत असलेल्या तीन मुलींचे प्रताप आईवडिलांना चकीत करणारे लावणारे आहेत. ‘बॉइज होस्टेल’मध्ये मुक्कामी राहून मद्यधुंद अवस्थेच डीजेचा ताल धरणाऱ्या या कॉलेज तरूणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील काही मुले ही दिल्ली आणि बिहारची आहेत.

अमरावतीतील पंचवटी चौकातील मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतीगृहात मद्यधुंद अवस्थेत तीन मुली आढळून आल्या. गाडगेनगर पोलिसांनी नशेबाज कॉलेज तरूणांचे भांडे फोडले. शिक्षणाच्या नावाखाली धिंगाणा घातला जात होता. त्यामुळे काही मुले या प्रकाराला कंटाळलेली होती. दिल्ली आणि बिहारी विद्य़ार्थ्यांनी हॉस्टेलचा डान्सबार करून टाकल्याची चर्चा होती. याची पोलिसांना माहिती मिळताच धाड टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. या घटनेने ‌अमरावतीतील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धिंगाणा घालणाऱ्या कॉलेज विद्य़ार्थ्यांची माहिती पोलिसांनी वसतीगृह आणि कॉलेज प्रशासनाला दिल्यानंतर या विद्यार्थ्यांवर कॉलेजच्या अधिष्ठात्यांनी पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला.

घटनेची माहिती पोलिसांनी कॉलेज प्रशासनाला दिली असली, तरी कॉलेजने बदनामी टाळण्यासाठी रीतसर तक्रार देण्याचे टाळल्याने पोलीस स्टेशनमध्ये याबाबत कोणत्याही कारवाईची नोंद नव्हती. यापुढे असा प्रकार आढळल्यास प्रवेश रद्द करण्याची तंबी कॉलेजने दिली.

होस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी तीन मुली नेहमीच दिसत. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या मुली नेहमीच ` बॉइज होस्टेल` मध्ये मुक्कामी असतात, असे आढळले. घटनेच्या दिवशी तीन मुली आणि पाच मुले होस्टेलमध्ये `डीजे` च्या तालावर नाचत होते. चौकशीत या तीनही मुली मुंबईच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच विद्यार्थ्यांपैकी काही दिल्लीचे, तर काही बिहारचे आहेत.

First Published: Sunday, November 4, 2012, 09:12


comments powered by Disqus