Last Updated: Saturday, August 17, 2013, 19:16
www.24taas.com झी मीडिया,औरंगाबादमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्राम संघटना आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांना जोरदार भिडलेत. यावेळी राष्ठ्रवादीचे नेते विनायक मेटे यांच्याववर अंडी फेकून मारलीत.यावेळी कार्यकर्त्यात तुफान मारहाण झाली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षण जागर परिषदेत जोरदार गोंधळ झाला. आमदार विनायक मेटेंना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंडी फेकून मारली. छावा संघटना आणि शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. संत तुकाराम नाट्यगृहात हा प्रकार घडला. यामुळे मराठा आरक्षणाचा वाद ऐरणीवर आला.
कित्येक निवडणुका आल्या आणि गेल्या, मात्र मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर ना कुठलं ठोस उत्तर मिळालंय, ना कुठला राजकीय पक्ष याच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. वर्षानुवर्षं हा प्रश्न प्रलंबित आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आता या प्रलंबित मुद्द्यावर वेगळीच भूमिका घेत विषयाचा रोख वेगळ्याच दिशेला वळवलाय. सर्वच जातीतल्या मागासांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका पवारांनी मांडलीय. राष्ट्रवादीच्या या नव्या भूमिकेमुळं मराठा आरक्षणाच्या मागणीतला जोर कमी होईल का? अशी चर्चा असताना आज गोंधळ दिसून आला.
आर्थिक निकषांवर दुर्बल घटकांना आरक्षण देण्यात यावं या राष्ट्रवादीच्या मागणीनं मराठा आरक्षणाच्या मागणीतला जोर कमी होईल का ? राष्ट्रवादीच्या मागणीमागे काही राजकारण आहे का ? आणि ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर होऊ शकतील का ? यासारखे प्रश्न उपस्थित कऱण्यात आले होते. आज याला वाचा फुटली. विनायक मेटे राजकरण करत असल्याचे आरोप करत आज काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंड्यांचा मारा केला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राजकीय आखाडा झालाय आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 17, 2013, 16:23