`एक बिहारी सौ पर भारी` सिनेमात मनसेचा राडा , ek bihari sau par bhari

`एक बिहारी सौ पर भारी` सिनेमात मनसेचा राडा

`एक बिहारी सौ पर भारी` सिनेमात मनसेचा राडा
www.24taas.com, औरंगाबाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेले काही दिवस बिहारी नागरिकांवर चांगली सडकून टीका केली. आणि त्याचे पडसाद देशभरात उमटू लागले. मात्र आता मुंबईसह महाराष्ट्रात मनसे कार्यकर्तेही वेगवेगळ्या मार्गाने बिहारींना त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

औरंगाबादमध्‍ये सराफा रोड येथील मोहन चित्रपटगृहात सुरू असलेला `एक बिहारी सौ पर भारी` या चित्रपटाचा खेळ मनविसेचे जिल्हाध्यक्ष गौतम आमराव यांच्या नेतृत्वात बंद पाडला. तर ठाणे जिल्‍ह्यातही असाच प्रकार घडला. बोईसर येथे केटी व्हिजन सिनेमामध्‍ये या चित्रपटाचा खेळ सुरु होता.

तो कार्यकर्त्‍यांनी बंद पाडला. प्रेक्षकांना मारहाणही करण्‍यात आली. चित्रपटगृहाचेही नुकसान करण्‍यात आले. काही दिवसांपूर्वीच दक्षिण मुंबईत ग्रांट रोड येथे या चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता. त्‍यानंतर औरंगाबादमध्‍येही पडसाद उमटले.

First Published: Wednesday, September 5, 2012, 14:34


comments powered by Disqus