Last Updated: Monday, October 29, 2012, 11:27
www.24taas.com, औरंगाबादऔरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडीनं ऐनवेळी उमेवार बदललाय. कविता जाधव यांच्याऐवजी फिरदोस फातिमा यांना उमेदवारी दिली आहे.
महापौर आणि उपमहापौरपदाची आज निवडणूक होतेय. महापौरपदासाठी सहा तर उपमहापौरपदासाठी 12 उमेदवार रिंगणात आहे. मुख्य लढत मात्र य़ुती विरोधात आघाडी अशीच होणार आहे. शिवसेनेकडून कला ओझा रिंगणात आहेत. तर उपमहापौरपदासाठी युतीकडून भाजपचे संजय जोशी तर भाजपचे निलंबित नगरसेवक राजू शिंदे यांनी आघाडीच्या पाठिंब्यावर उपमहापौरपदाचा अर्ज भरलाय. जिल्हा परिषदेप्रमाणे महापालिकेतही शिवसेना भाजपला धक्का देण्याचा आघाडीचा प्रयत्न राहणार आहे. आजच्या निवडणुकीतून शहराला 19 वा महापौर मिळणार आहे.
या सगळ्या गोंधळात राष्ट्रवादीने वेगळीच खेळी केली आहे भाजपचे निलंबित नगरसेवक राजू शिंदे यांना राष्ट्रवादी ऐनवेळी उपमहापौर पदासाठी आपला उमेदवार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे. याचा फायदा म्हणजे भाजपचे काही नाराज नगरसेवक शिंदे यांना मतदान करण्याची शक्यता आहे या पद्धतीने जर मतदान झाले तर उपमहापौरपद राष्ट्रवादीच्या गळ्यात पडू शकते..
First Published: Monday, October 29, 2012, 11:27