पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने मुलाला चटके,Father and stepmother with the help of the four-year son

पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके

पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

महिलांबरोबरच लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनात दिवसोंदिवस वाढ होतेय. पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके दिल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शेजारऱ्यांनी माणुसकी दाखवत बाल कल्याण समितीची मदत घेऊन या लहानग्याची या त्रासातून सुटका केलीय.

अतिशय भेदरलेल्या अवस्थेक असलेला हा चिमुरडा ४ वर्षांचा अभिषेक. आपल्या घरातच तो नरक यातना भोगत होता. अभिषेकच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. या दुसऱ्या आईला आधीच एक अपत्य होतं, त्यात त्यांना अजून एक बाळ झालं आणि अभिषेकचे हाल सुरू झाले.

शुल्लक कारणावरून अभिषेकला मारहाण व्हायची त्यातच त्याच्या या सावत्र आईने आणि बापाने अभिषेकच्या हातावर आणि तोंडावर चटके दिलेय. चटके दिल्यावर जोराने अभिषेक रडायला लागल्याने त्याच्या ओठाला सुद्धा या निर्दयी पालकांनी चटके दिलेय. मात्र हा सगळा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी बालकल्याण समितीच्या सहाय्यानं या बालकाची या नरक यातनेतून सुटका केलीय.

सगळा प्रकार लक्षात घेवून आता बालकल्याण समितीने अभिषेकाची रवानगी अनाथआश्रमात केलीय. तसंच अभिषेकच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत. भेदरलेला अभिषेक आई वडिलांच्या अत्याचाराची दुर्देवी कहाणी सांगतो. या आधी सुद्धा या मुलाला पालकांनी असाच त्रास दिला होता. त्यावेळी पालकांना समज देण्यात आली. वैरी असलेल्या या पालकांनी अभिषेकवर अत्याचार सुरूच ठेवले होते.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हि़डिओ


First Published: Thursday, January 9, 2014, 23:28


comments powered by Disqus