Last Updated: Tuesday, March 25, 2014, 14:20
www.zee24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद, औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एक धक्कादायक घटना घडलीय. वडिलांनीच आपल्या दोन मुलींचा आणि बायकोचा गळा आवळून खून केलाय. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडलाय.
औद्योगिक वसाहतीतच एका कंपनीत जितेंद्र धांडे काम करीत होते. सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर धांडे वरच्या घरात झोपायला गेले. पहाटे त्यांच्या भावाने भयानक आवाज ऐकले. तसाच त्यांचा भाऊ धावत वरच्या घरात गेल्यावर त्यांना हे दुर्देवी दृष्य दिसले.
मृतांपैकी एक मुलगी ३ वर्षांची होती तर एक मुलगी ९ महिन्यांची होती. दरम्यान आरोपीने खून का केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर घटनेतील आरोपी जिंतेद्र धांडे यांना पोलिसांनी अटक केली असून, घटनेचा तपास सुरु आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 14:20