Last Updated: Thursday, December 12, 2013, 18:54
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसी भागात मेणबत्तीच्या गोडाऊनला भीषण आग लागलीय. या आगीत जवळजवळ तीन कोटींचं नुकसान झालंय.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी गोडाऊनमध्ये काही केमिकल असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे छोट्या स्फोटांचेही आवाज येत आहे. या भीषण आगीळे लोळ तब्बल तीन किलोमीटर वरूनही दिसत आहेत.
अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र आग खूपच भीषण असल्यानं आग विझवण्यास लागेल अशी शक्यता अग्निशमल दलाच्या जवानांनी व्यक्त केलीय.
सुदैवाने या कंपनीच्या बाजूला दुसरी कुठलीही कंपनी नाही त्यामुळे आग पसरण्याचा धोका नाही, आणि जिवीतहानी सुद्धा झाली नसल्याची माहिती मिळतेय.
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 12, 2013, 18:32