Last Updated: Tuesday, March 25, 2014, 18:57
www.24taas.com, झी मीडिया, नांदेडनांदेडमध्ये अद्याप काँग्रेसचा उमेदवार कोण हे ठरलेले नसले तरी अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता अशोक चव्हाण आणि पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
अशोक चव्हाण शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
काँग्रेसनं अद्याप उमेदवारी जाहिर केली नसली तरी तिथं काँग्रेसची उमेदवारी सध्या राजकीय विजनवासात असलेले अशोक चव्हाण किंवा त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
भास्करराव पाटील खतगांवकर यांनी माघार घेऊन अशोक चव्हाण यांचा मार्ग मोकळा करुन दिलाय. नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला अनुकुल वातावरण असून, महायुतीकडून फार मोठं आव्हान दिलं जाईल अशी सध्याची स्थिती नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 17:59