Last Updated: Sunday, February 3, 2013, 14:46
www.24taas.com, नांदेडदिल्लीमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सरकारविरोधात रान पेटलं असतानाच नांदेड जिल्ह्यातल्या काकांडीजवळ 20 ते 25 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं उघड झालंय. या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.
मात्र या अत्यंत निर्दय पद्धतीनं तिला शारीरिक वेदना देण्यात आल्याचं तपासात समोर आलंय. तिच्या अंगावर सिगारेटचे चटके दिल्याचे असंख्य व्रण आहेत. क्रौर्याची परिसीमा गाठणा-या या घटनेचा नांदेड ग्रामीण पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या पाच जणांवर फास्टट्रॅक कोर्टाने आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा आता अटळ झाली आहे.
First Published: Sunday, February 3, 2013, 14:46