Last Updated: Tuesday, February 5, 2013, 23:43
www.24taas.com, नांदेडशाळेतून घरी परतणा-या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. भोकरमध्ये हा सर्व प्रकार घडलाय.
रिक्षातून मुलीला जंगलात नेऊन चार नराधमांनी या मुलीवर बलात्कार केला. या आरोपींमध्ये एका बडतर्फ पोलिसाचाही समावेश आहे. भोकरजवळच्या सीताखंडीच्या जंगलात हा प्रकार घडलाय.
दोन दिवसांपूर्वी एका तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिची निघृण हत्या केल्याचा प्रकार नांदेडात उघड झाला होता. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात चाललंय तरी काय, असा प्रश्न निर्माण झालाय.
First Published: Tuesday, February 5, 2013, 23:43