औरंगाबादमध्ये दोन तरुणींवर सामूहिक बलात्कारgang Rape on two girls in Aurangabad

औरंगाबादमध्ये दोन तरुणींवर सामूहिक बलात्कार

औरंगाबादमध्ये दोन तरुणींवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

औरंगाबादच्या भांगसी माता परिसरात दोन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.

शुक्रवारी संध्याकाळी या दोन मुली आपल्या मित्रांसोबत भांगसी गडावर मातेच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. मात्र परत येताना अंधार झाला होता. हा परिसर तसा निर्जन असतो. संध्याकाळी परतत असताना पाच जणांच्या टोळक्यांनी त्यांना अडवलं आणि मुलींसोबत असलेल्या मुलांना मारहाण केली. मुलांना बांधूनही ठेवलं आणि त्यांच्या डोळ्यासमोरच या मुलींवर बलात्कार केला.

याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केलीय. सर्व आरोपी वाळूज एमआयडीसीत रोजंदारीवर काम करणारे आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 8, 2014, 15:02


comments powered by Disqus