Last Updated: Tuesday, October 23, 2012, 09:05
www.24taas.com, अंबाजोगाईपैसे कसे खावेत, हे अजित पवारांकडून शिकावे. पैसे खाण्याचे शिक्षण घेण्यासाठी लोक राष्ट्रवादीत जातात, असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांना मारला. अंबाजोगाई येथे गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत आज भाजपा कार्यकर्त्यांची बैठक झाली.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जबरदस्त हल्लाबोल केला. पैसे कसे खावेत, हे अजित पवारांकडून शिकावे. किंबहुना पैसे खाण्याचे शिक्षण घेण्यासाठीच लोक राष्ट्रवादीत जातात, असा टोलाही त्यांनी मारला.
सिंचन तसेच इतर घोटाळ्यांच्या विरोधात आपण महाराष्ट्रभर दौरा काढणार असल्याचे ते म्हणाले. औरंगाबादमध्ये ३० ऑक्टोबर रोजी भाजपाचा मोठा मेळावा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
First Published: Tuesday, October 23, 2012, 07:54