Last Updated: Saturday, May 31, 2014, 18:19
www.24taas.com, कल्पना मुंदडा, झी मीडिया, गंगाखेडपरभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये एका महिलेला एका गुंडाने बेल्टने मारहाण केली आहे. ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली आहे.
ही महिला गंगाखेडच्या उप जिल्हा रूग्णालयात कंत्राटी सफाई कामगार आहे.
या गुंडाने या महिलेचा धक्का का मारला, वाईट हितूने धक्का मारल्याचं महिलेला लक्षात आल्यानंतर, या महिलेने या गुंडाला जाब विचारला.
मात्र या महिलेने कमरेचा बेल्ट काढून या महिलेला बेदम मारहाण केली. या गुंड मुलाचं नाव धर्मराज होबाळे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
मात्र या आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेलं नाही. हॉस्पिटलकडून पोलिसांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 31, 2014, 13:53