मनसेच्या जोखडातून मुक्त झालो- हर्षवर्धन जाधव Harshvardhan Jadhav on resigning

मनसेच्या जोखडातून मुक्त झालो- हर्षवर्धन जाधव

मनसेच्या जोखडातून मुक्त झालो- हर्षवर्धन जाधव
www.24taas.com, औरंगाबाद

मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव मनसे सोडणार असून ते उद्या आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे ते आमदार असून यापूर्वीही ते मनसे सोडणार असल्याची चर्चा होती. परंतु त्यावेळी त्यांची नाराजी दूर करण्यात मनसे नेत्यांना यश आलं होतं. मनसेच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी झी 24 तासला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत म्हटलंय. यापुढे कोणत्याही पक्षात जाणार नसून, वडिलांच्या नावावर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

मनसेच्या जोखडातून मुक्त झाल्याची भावना व्यक्त करतानाच, पक्षप्रमुख आपल्याशी अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलल्याची खंतही त्यांनी व्यक्त केलीय.

First Published: Tuesday, January 8, 2013, 23:25


comments powered by Disqus