मनसे आमदाराचा पालकमंत्र्यांवर मनमानीचा आरोप Harshvardhan jadhav`s Accusation

मनसे आमदाराचा पालकमंत्र्यांवर मनमानीचा आरोप

मनसे आमदाराचा पालकमंत्र्यांवर मनमानीचा आरोप
www.24taas.com, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये जिल्हा नियोजन समितीने 2012-13 या वर्षाच्या योजनेत 66 कोटी रुपयांच्या कामांना नियमबाह्य मान्यता दिल्याचा आरोप मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी मनमानी करत निधीचे वाटप करीत असल्याचा आरोपही जाधव यांनी केलाय. याविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कामे निश्चि त करताना ग्रामपंचायती, नगरपालिका व महापालिकेला विश्वालसात घेतले नाही असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. तसंच लोकसंख्या, क्षेत्रफळ व मानव विकास निर्देशांक या सूत्रांना हरताळ फासून मनमानीपणे निधीचे वितरण केल्याचंही जाधव यांचं म्हणणं आहे. या गैरप्रकारास नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणजेच पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी कुणालकुमार जबाबदार असल्याचा आरोपही आमदार जाधव यांनी केलाय. जिल्ह्याच्या २0१२-१३ या वर्षाच्या जिल्हा विकास योजनेत मंजूर करण्यात आलेली कामे रद्द करण्याची मागणीही आ. जाधव यांनी केलीय.

पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत मनमानी केल्याचा हर्षवर्धन जाधवांचा आरोप आहे. सरकारच्या जीआरना केराची टोपली दाखवत जिल्हा नियोजन आयोगाचा पैश्यांचे मनमानी वाटप करण्यात आलं. त्यासाठी कुणाचेही प्रस्ताव न मागवता थेट मोठ्या प्रमाणात संबंधित विभागांना रकमेचे वाटप केल्याचा आरोप मनसे आमदार हर्षवर्धन पाटील यांनी केला.

First Published: Monday, October 8, 2012, 22:29


comments powered by Disqus