नांदेडमध्ये हॉरर किलिंग, उशीनं तोंड दाबून केली मुलीची हत्याHorror Killing in Nanded, because of daug

नांदेडमध्ये हॉरर किलिंग, उशीनं तोंड दाबून केली मुलीची हत्या

नांदेडमध्ये हॉरर किलिंग, उशीनं तोंड दाबून केली मुलीची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, नांदेड

नांदेडमध्ये हॉरर किलिंगचा प्रकार उघड झालाय. आई वडिलांनीच लेकीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

या मुलीचं एका तरुणावर प्रेम होतं. मात्र तिच्या आईवडिलांचा या प्रेमाला विरोध होता. याच विरोधातून या दोघांनी तिची हत्या केली. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना अटक केलीय.

माधव जायभाये आणि छाया जायभाये असं या शिक्षक दाम्पत्याचं नाव आहे. त्यांनी १६ ऑक्टोबर २०१३ या दिवशी उशीनं तोंड दाबून निर्दयीपणे मुलीची हत्या केली होती. त्यानंतर मुलीचा आजारानं मृत्यू झाल्याची बतावणी केली होती.

पण दोन दिवसांपूर्वी पोलिसांना आलेल्या निनावी पत्राच्या आधारे केलेल्या चौकशीनंतर हा हॉरर किलिंगचा प्रकार उघडकीस आलाय. मुलीचं प्रेमप्रकरण मान्य नसल्यानं ही हत्या केल्याचं जायभाये दाम्पत्यानं मान्य केलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ


First Published: Sunday, January 12, 2014, 09:22


comments powered by Disqus