Last Updated: Wednesday, December 4, 2013, 22:47
www.24taas.com, झी मीडिया, जालनाजालन्यातल्या जेथलिया हॉस्पिटलमध्ये लहान मुलाची अदलाबदल झाल्याचा आरोप मुलाच्या आईवडिलांनी केलायं. रुग्णलाय प्रशासनानं हे आरोप फेटाळलेत. मात्र बाळाचे आणि आईच्या रक्ताचे नमुने डिएनएसाठी पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
जालन्यातल्या जेथलिया हॉस्पिटलमध्ये चार दिवासपूर्वी कविता गाढे आपल्या एक दिवसाच्या बाळासाठी दाखल झाल्या होत्या. या रुग्णालयात झालेल्या उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना स्त्री जातीचं बाळ सुपूर्द केलं. मात्र आम्हाला मुलगा झाला असून डॉक्टरांनी बाळ बदलल्याचा आरोप गाढे दाम्पत्यानं केलाय.
ज्या दिवशी बाळाला या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल तेव्हा ते स्त्रीजातीचच होत. मात्र बाळाची तब्बेत नाजूक होती.हे बाळ आई वडिलांपासून दूर राहिल्यानत्यांच्या मनात संशय निर्माण झाल्याचा खुलासा हॉस्पिटलन केलाय.याशिवाय बाळाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करणार असल्याचंही हॉस्पिटललनं सांगितलंय. तसंच ज्या उढाण हॉस्पिटलमध्ये गाढे यांची प्रसूती झाली त्यांनी जन्मदाखल्यावर मुलाची नोंद चुकून झाल्याचा दावा करत जेथलिया रुग्णालयाच्या दाव्याला बळ दिलंय.
बाळाची अदलाबदल होण्याची जालन्यातली ही पहिलीच घटना नाही. वर्षभरापूर्वीही अशीच घटना शहरात घडली होती. आता बाळ आणि आईच्या डिएनए चाचणीनंतरच या प्रकरणाचा खुलासा होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हि़डिओ
First Published: Wednesday, December 4, 2013, 22:42