Last Updated: Monday, January 6, 2014, 14:25
www.24taas.com, झी मीडिया, नांदेड बलात्काराला विरोध केला म्हणून एका विधवा महिलेला नराधमानं जिवंत जाळल्याची घटना घडलीय. नांदेडमधल्या कंधारमध्ये ही धक्कादायक आणि घृणास्पद घटना घडलीय. महिलेला पेटवून दिल्यानंतर हा नराधम फरार झालाय.
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासरणारी अजून एक धक्कादायक घटना घडलीय. नांदेड जिल्हातल्या कंधार तालुक्यात एका नराधमानं बलात्काराला प्रतिकार करणा-या विधवा महिलेला पेटवून दिलं. मंगळ सांगवी येथे ही घटना घडली. या विधवा महिलेच्या घरी घुसून नराधमानं महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र विधवा महिलेनं प्रतिकार केल्यानंतर नराधमानं महिलेला पेटवून दिलं...
७६ टक्के भाजलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नराधम आरोपी अजूनही फरार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 6, 2014, 12:22