Last Updated: Wednesday, July 24, 2013, 18:30
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादऔरंगाबादमध्ये वनविभागाच्या पिंज-य़ातून बिबट्यानं धुम ठोकलीय. या बिबट्याला कालच जामगाव गंगापूर शिवारात पकडण्यात आलं होतं. मात्र आज या बिबट्यानं पिंज-यातून धूम ठोकलीय.
वनविभागाचं कार्यालय उस्मानपुरा या शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. बिबट्या नक्की पळाला कसा पिंजरा उघडा तर राहिला नव्हता ना याचाही आता कर्मचारी तपास करीत आहे..
या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय. हा बिबट्या शहरातल्या नागरी वस्तीमध्ये द़डून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतीय. पळालेल्या बिबिट्यासाठी शोधमोहिम वनविभागानं हाती घेतलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 24, 2013, 18:30