लोहा नगरपालिका मनसेच्या ताब्यात, loha municipal council won by MNS

लोहा नगरपालिका मनसेच्या ताब्यात

लोहा नगरपालिका मनसेच्या ताब्यात

www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
नांदेड जिल्ह्यातील लोहा पालिकेवर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा फडकविला आहे. मनसेने १७ पैकी ९ जागेवर यश मिळवत काँग्रेसला धूळ चारली आहे. या विजयाने राज ठाकरे यांनी मराठवाड्यात पहिली नगरपालिका जिंकण्याचा कारनामा करू दाखविला आहे.

या निवडणुकीत काँग्रेसला ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खात्यात एकही जागा आली नाही.

माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर याचे या पालिकेवर वर्चस्व होते. ते सध्या राष्ट्रवादीत गेले होते. पण त्यांना एकही जागा न मिळाल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. या निवडणुकीत अजित पवार यांनीही सभा घेतली होती. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

दरम्यान शिवसेना माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्याचाही फायदा मनसेला झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.





First Published: Monday, October 28, 2013, 14:53


comments powered by Disqus