Last Updated: Friday, February 22, 2013, 16:11
www.24taas.com, नवी दिल्ली हैदराबाद स्फोटांचं मराठवाडा कनेक्शन उघड होतंय. पुणे स्फोटांतला आरोपी सईद मकबूलनं हैदराबादेत रेकी केल्याचं समोर आलंय.
मकबूल हा मुळचा नांदेड जिल्ह्यातल्या धर्मबादचा आहे. त्याला ऑक्टोबरमध्ये पुणे स्फोटांच्या कनेक्शनमध्ये हैदराबादमध्येच अटक करण्यात आली होती. मकबुलनं दिलसुखनगर, बेगमपेट, ऍबिड्स या भागांची टेहळणी केल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं होतं.
एनआयएची सूत्रं स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा दावा करत आहेत. दोन दिवसांपूर्वी या परिसरात इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख यासीन भटकळ यानं या बॉम्बस्फोटासाठी मास्टरमाईंडचं काम केलं. त्यानंही या परिसराची रेकी केल्याचं उघड झालंय. भटकळच्याच मार्गदर्शनाखाली मकबूलही तिथं पोहचल्याचं समजतंय. इंडियन मुजाहिद्दीनने यापूर्वी दिल्ली, जयपूर, पुणे, अहमदाबाद आणि मुंबईतील स्फोट घडवून आणले होते.
First Published: Friday, February 22, 2013, 11:00