Last Updated: Sunday, February 16, 2014, 15:57
www.24taas.com, झी मीडिया, बीडमाढाच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. माढाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं, महादेव जानकर नाराज झाले आहेत. महादेव जानकर यांनी माढाच्या जागेचा आग्रह धरलाय.
माढ्याची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याबाबत महायुती ठाम असल्यामुळं महादेव जानकर नाराज झालेय. महायुतीच्या जागावाटपात ही जागा राजू शेट्टी यांच्या शेतकरी स्वाभिमान पक्षाला देण्याचं ठरलं आहे.
मात्र महादेव जानकर माढ्याच्या जागेकरता आग्रही आहे. चार वाजता बीडमध्येयाबाबत महत्वाची बैठक आहे. या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे,स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी आणि महादेव जानकर उपस्थित राहणार आहे.
सध्या महायुती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माढ्याची जागा देण्यावर ठाम असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 16, 2014, 15:56