Last Updated: Monday, October 15, 2012, 14:44
www.24taas.;com, नांदेडनांदेड महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी आपला करिष्मा दाखवला आणि पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यास ते सज्ज झाले. अशोक चव्हाण यांना विरोधक कोंडीत पकडणार असं वाटत होतं. मात्र विरोधकांना नाकारून नांदेडवासियांनी पुन्हा एकदा काँग्रेसवरच विश्वास दाखवला आहे.
या निवडणुकीत मनसेला काही जागा मिळण्याची आशा होती. मात्र मनसेला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. नांदेड मनपा निवडणुकीत विरोधकांचा काँग्रेसने पद्धतशीरपणे धुव्वा उडवला आहे. मनसे आणि भाजपला भोपळा फोडण्यात अपयश आलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीची अवस्था जैसे थे तशीच राहीली आहे.
मनसेचा भ्रमाचा भोपळा नांदेडमध्ये फुटला. निमशहरी भागातही मनसेचा जनाधार नाही. तर भाजपच्या जागाही कमी झाल्या राष्ट्रवादीने निवडणूक प्रतिष्ठेची करुनही नांदेडमध्ये राष्ट्रवादीला जागा वाढवता आलेल्या नाहीत.
First Published: Monday, October 15, 2012, 14:21