Last Updated: Saturday, August 10, 2013, 12:49
www.24taas.com, झी मीडिया, अकोलाअकोला जिल्ह्यातील शिर्ला गावात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रयत्न एका नराधम शिक्षकाने केलाय. चंदू गोतरकर असं या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाला `आदर्श` पुरस्कार मिळाला आहे. त्याने विद्यार्थीनीचा विनयभंग केलाय.
तो पातुर तालुक्यातील शिर्ला येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोतरकरला अटक झालीये. संबंधित मुलीच्या आईने पातुर पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी कारवाई केली. विशेष म्हणजे चंदू गोतरकर याला अकोला जिल्हा परिषदेचा वर्ष २०१२- १३ चा `आदर्श शिक्षक` पुरस्कार मिळालाय.
गोतरकर शिर्ला गावात शिक्षक म्हणून एका महिन्याआधीच बदलून आलाय. तो वर्ग दोन ते चारवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सहावीतील विद्यार्थिनीचा वर्गातच दुपारच्या सुट्टीत विनयभंग केलाय. गोतरकर याने असा प्रकार सहाव्या वर्गातील इतर चार विद्यार्थिनींशी केल्याचेही पिडीत मुलीच्या आईने सांगितलेय.
या आधी गोतरकर कार्यरत असलेल्या देऊळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत असताना असाच प्रकार केल्याचे सूत्रांनी सांगितलेय. मात्र तेव्हा या प्रकाराची तक्रार करण्यात आली नव्हती. अशा विकृत शिक्षकाला `आदर्श शिक्षक` पुरस्कार मिळतोच कसा ? असा संतप्त सवाल पालकवर्गातून विचारला जातोय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, August 10, 2013, 12:16