दोन चिमुरड्यांचा गळा दाबून आईचा आत्महत्येचा प्रयत्न, mother suicide after killed two children

दोन चिमुरड्यांचा गळा दाबून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन चिमुरड्यांचा गळा दाबून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

www.24taas.com, झी मीडिया, अकोला

अकोल्यात आईनेच दोन मुलांचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अकोल्यातील सिव्हिल लाईन परिसरातील शास्त्रीनगर भागात हा प्रकार घडला. मुलांच्या आईची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

अकोल्यात एका मातेने आपल्या दोन चिमुकल्यांची गळा दाबून हत्या केलीय. स्वाती जैन असं या महिलेचं नाव आहे. ती शास्त्रीनगर भागातील `आभा अपार्टमेंट` मध्ये राहते. स्वाती जैन हिने आपल्या तन्वी आणि तनिष्क या मुला-मुलीचा गळा दाबून खून केलाय. यातील तन्वी ही सहा वर्षांची तर तनिष्क हा फक्त तीन वर्षांचा होता.

रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही मुलांचा गळा आवळल्यानंतर स्वाती हिनेही गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फसल्यानंतर तिने हाताची नस कापून आत्महत्येचा दुसरा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या स्वातीवर सध्या अकोलामधील `आयकॉन` या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिलीय.

शास्त्रीनगर भागातील `आभा अपार्टमेंट`मध्ये अशोक जैन यांचं चार जणांचं कुटुंब राहतंय. अशोक हे अकोल्यातील एका खाजगी व्यापाऱ्याकडे काम करतात. हा भाग अकोल्याच्या सिव्हिल लाईन परिसरात `आकाशवाणी` केंद्राच्या अगदी मागे आहे. सिव्हिल लाईन परिसर अकोल्यातील उच्चभ्रू लोकांची वस्ती समजली जातेय. विशेष म्हणजे घटनास्थळापासून अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या दोन चिमुकल्यांची हत्या कौटुंबिक कलहातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिलीय. मात्र, यासंदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही.

दरम्यान एका महिन्यात अकोल्यात घडलेलं हे दुसरं दुहेरी हत्याकांड आहे. गेल्याच महिन्यात १८ डिसेंबर रोजी अकोल्यातील रणपिसेनगर भागात ज्योती आणि राणी शर्मा या मायलेकींची हत्या झाली होती. त्यातील मारेकरी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तर आत्ताच्या, आईनेच मुलांना मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं अकोल्यातलं समाजमन हादरलं आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 17, 2014, 17:54


comments powered by Disqus