मुस्लिम समाजाने साजरी केली शिवजयंती Muslims celebrating Shivjayanti

मुस्लिम समाजाने साजरी केली शिवजयंती

मुस्लिम समाजाने साजरी केली शिवजयंती
www.24taas.com, लातूर

राज्यात अनेक ठिकाणी आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लातूरमधल्या औसा तालुक्यातही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

औसामध्ये मुस्लिम बांधवांनी सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. औसामधल्या अल्पसंख्याक विचार मंचच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी शहरातल्या मुख्य चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पुजन करत भगवा झेंडाही फडकावला.

शिवाजी महाराजांच्या राज्यात मुस्लिम बांधव आनंदात राहत होते. महाराजांचे अंगरक्षक आणि सैन्य दलातही मुस्लिम मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शिवाजी महाराज कधीच मुस्लिम विरोधक नसल्यामुळे सर्वच मुस्लिम बांधवांनी शिवजयंती साजरी करत असल्याचं म्हटलंय.

First Published: Tuesday, February 19, 2013, 23:39


comments powered by Disqus