लाख, दोन लाख म्हणजे काहीच नाही हो!, narayan kuche on ghodebajar

लाख, दोन लाख म्हणजे काहीच नाही हो!

लाख, दोन लाख म्हणजे काहीच नाही हो!
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी नारायण कुचे निवडून आलेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणताही घोडेबाजार केला नाही, असा दावा त्यांनी केलाय.

औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक मीर हिदायत अली यांनी केलाय. नारायण कुचे यांनी निवडणुकीच्या अगोदर नगरसेवकांसाठी ‘पिकनिक’ अरेन्ज केली होती याबद्दल त्यांना विचारलं असता ‘नगरसेवकांना पिकनिकला नेण्यात काही गैर नाही’ अशी मल्लिनाथीही त्यांनी केली.

‘हल्ली अशा निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च होतात. मी केवळ दोन लाख रुपयेच खर्च केलेत’ असं सांगण्याचा निर्लज्जपणाही कुचे यांनी केलाय. गेली काही वर्षं हे पद शिवसेना किंवा भाजपकडेच आहे. अशा वेळी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी घोडेबाजार होतो, असं म्हणत भाजपच्या नारायण कुचे यांनी स्वपक्षियांनाच टार्गेट करत असल्याचं दिसतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 1, 2013, 20:40


comments powered by Disqus