मोंदीची आज धुळ्यात जाहीर सभा, Narendra modi public meeting today in dhule

मोंदीची आज धुळ्यात जाहीर सभा

मोंदीची आज धुळ्यात जाहीर सभा
www.24taas.com, झी मीडिया, धुळे

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज धुळ्यात सभा होतीय. धुळे लोकसभा मतदारसंघातले उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी होणा-या या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय.

धुळे शहरातल्या शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर सकाळी 11 वाजता ही सभा होत असून या सभेसाठी 30 एकर जागेची व्यवस्था करण्यात आली असून 30 बाय 40 फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आलंय.

सभास्थळी सुरक्षेचीही जय्यत तयारी करण्यात आली असून सोलापूर, अकोला, अमरावतीमधून पोलीसांची जादा कुमक मागवण्यात आलीय. या सभेला 2 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहतील असा विश्वास भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुनील नेरकर यांनी व्यक्त केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 22, 2014, 09:13


comments powered by Disqus