नगरसेवकाच्या मुलांनी केला पोलिसावर प्राणघातक हल्ला! NCP corporators sons attack API

नगरसेवकाच्या मुलांनी केला पोलिसावर प्राणघातक हल्ला!

नगरसेवकाच्या मुलांनी केला पोलिसावर प्राणघातक हल्ला!
www.24taas.com, धुळे

आमदारांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशीना केलेल्या मारहाणीच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच धुळ्यात नगरसेवकाच्या मुलांनी पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. एपीआय धनंजय पाटील यांच्यावर तलवारीचे वार करून हल्ला केला आहे.

याप्रकरणी हल्लेखोर देवा आणि भूषण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हे दोघे हल्लेखोर राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांची मुले आहेत. जुन्या धुळ्यात ही घटना घडली आहे. जखमी पाटील यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन गटांमध्ये सुरू असलेल्या हाणामारीला थांबवण्यासाठी धनंजय पाटील गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पाटील गंभीर जखमी झाले असले, तरी आता त्यांची प्रकृती स्थिर असण्याचं सांगण्यात येत आहे.


आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही दिवसांपूर्वी संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले होते. आमदारांनंतर आता नगरसेवकपुत्रांनी पोलिसांवर हल्ला केल्यामुळे खाकी विरुद्ध खादी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

First Published: Tuesday, March 26, 2013, 23:09


comments powered by Disqus