आता उंदीर, बेडुक, झुरळं कापण्यावर बंदी?, No dissection fro students?

आता उंदीर, बेडुक, झुरळं कापण्यावर बंदी?

आता उंदीर, बेडुक, झुरळं कापण्यावर बंदी?
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

बारावीतील विद्यार्थी उंदीर , बेडूक , झुरळ , गांडूळ या आणि अन्य प्राण्यांच्या डिसेक्शन प्रात्यक्षिकावर बंदी प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावलीय.

दिगंबर जैन सेवा समितीच्या औरंगाबाद शाखेचे अनंत मणुरकर यांनी ही याचिका केलीय. या प्राण्यांच्या डिसेक्शनमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो. लहान वयातच विद्यार्थ्यांना हिंसेचे धडे गिरवावे लागतात. मुक्या प्राण्यांचा बळी जातो. असा दावा यामध्ये करण्यात आलाय.

सीबीएसई , आयसीएसई या बोर्डांनी यावर बंदी घातलीय . मात्र महाराष्ट्रात हे डिसेक्शन चालूच आहे त्यामुळे यावर तातडीनं बंदी घालण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 18:41


comments powered by Disqus