मुंडे गेले, ही भावना सहन न झाल्याने तणाव - पंकजा मुंडे

मुंडे गेले, ही भावना सहन न झाल्याने तणाव - पंकजा मुंडे

मुंडे गेले, ही भावना सहन न झाल्याने तणाव - पंकजा मुंडे

www.24taas.com, झी मीडिया, परळी

आपला नेता गेला, यावर संपूर्ण महाराष्ट्राचा काय तर माझाही विश्वास बसत नाहीय, असं गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

यावेळी मुखाग्नि देतांना आपला हात भाजला गेला, तसेच एक दगड आपल्या डोक्याजवळून केला, सुदैवाने आपण यात थोडक्यात बचावल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांचा भावनेचा हा उद्रेक आहे, मुंडे गेले ही भावना त्यांना सहन होत नसल्याने, हा तणाव निर्माण झाला आहे.

मुंडे साहेबांवरील प्रेमामुळे त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत, यामुळे काही हानी झाली असेल, तर आपल्याला माफ करावं, मी माफी मागते, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 4, 2014, 17:35


comments powered by Disqus