Last Updated: Monday, November 18, 2013, 20:22
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादपेट्रोल द्यायला उशीर केला म्हणून पोलिसानं पेट्रोल देणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलीय.
औरंगाबादमधील जळगाव रोडवरील साईगंगा पेट्रोलपंपावर एक पोलीस दुचाकीत पेट्रोल भरण्यास गेला होता. सकाळची वेळ असल्यानं पंपावर गाड्यांची मोठी रांग होती. पोलिसानं तिथल्या कर्मचाऱ्याला आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यास सांगितलं असता, त्या कर्मचाऱ्यानं त्याला रांगेत गाडी आणण्याची विनंती केली. त्यानंतर संतापलेल्या पोलिसानं त्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली.
पोलिसाचा हा प्रताप तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. त्या पोलिसाचं नाव कळू शकलं नसलं तरी त्या कर्मचाऱ्यानं पोलिसाच्या दुचाकीचा नंबर लक्षात ठेवत सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून खरोखरच ते त्या पोलिसावर कारवाई करतील का, हे पहावे लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Monday, November 18, 2013, 20:22