Last Updated: Tuesday, September 17, 2013, 14:44
www.24taas.com, झी मीडिया, जळगावजळगावात रक्षकच भक्षक बनल्याची घटना उघडकीला आली आहे. पोलीस मुख्यालयात नियुक्तीवर असलेल्या गणेश पाटील या पोलीस शिपायाने १७ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार केला.
जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारातील बहुउद्देशीय सभागृहात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर चीड व्यक्त होत आहे. पीडित तरुणी पोलीस मुख्यालयाच्या आवारातील तरण तलावावर पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत होती. तिला लग्नाचे आमिष दाखवून विवाहित असलेल्या गणेश पाटील या पोलीस शिपायाने तिच्यावर बलात्कार केला.
पीडित तरुणीने जिल्हापेठ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गणेश पाटीलवर बलात्कार तसंच बालशोषण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. आश्चर्यजनक म्हणजे या तरण तलावावर महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे अपेक्षित असताना गणेश पाटील याला कसे काय नियुक्त केली. तोच मुलींना प्रशिक्षण देत होता. याकडे पोलीस अधीक्षकांनी कसे काय दुर्लक्ष केले, याचीच चर्चा सुरू आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 17, 2013, 14:42