प्रदीप जयस्वाल पुन्हा सेनेत, Pradeep Jaiswal back to sena

प्रदीप जयस्वाल पुन्हा सेनेत

प्रदीप जयस्वाल पुन्हा सेनेत
www.24taas.com,मुंबई

पैशाचे आरोप करून शिवसेनेतून बाहेर पडलेले प्रदीप जयस्वाल पुन्हा सेनेत दाखल झाले आहे. त्यांनी आज मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेवून सेनेत प्रवेश केला.

प्रदीप जयस्वाल यांनी राजकीय जिवनाची सुरुवात शिवसेनेच्या कार्यकर्त्यापदापासून केली.प्रदीप जैस्वाल सध्या औरंगाबाद मध्यचे अपक्ष आमदार आहेत. जयस्वाल शिवसेनेचे नगरसेवकपदावर आणि शहराच्या महापौरपदावरही राहिले आहेत. शिवसेनेकडून एकवेळा त्यांनी खासदारकीही भूषवली आहे. तर २००४ च्या निवडणुकीत जयस्वाल यांचा राजेंद्र दर्डा यांनी पराभव केला होता आणि त्यानंतर त्यांचे शिवसेनेसोबत बिनसले होते.

शिवसैनिकांनीच त्यांचा पराभव केल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर शिवसेनेनं २००९मध्ये त्य़ांना आमदारकीचे तिकीट नाकारले होते त्यावेळेस जैस्वाल यांनी उद्दव ठाकरे यांची स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर याच्यावर पैसै घेऊन तिकीट विकत असल्याचा आरोप केला होता आणि अपक्ष म्हणून मैदानात उडी मारली आणि शिवसेनेच्या विकास जैन यांचा पराभव केला.

आमदार होताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर मिळाल्यानंतरही त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, वर्षभऱ काँग्रेस राष्ट्रावादीच्या काही कार्यक्रमांना ते हजरही राहिले मात्र नंतर कुचंबणा होत असल्याचे काऱण देत त्यांनी काँग्रेस राष्ट्रावादीच्य़ा तंबूला सोडचिठ्ठी दिली आणि आता अखेर त्यांनी पुन्हा शिवसेनेचीच वाट निवडली.

First Published: Saturday, August 25, 2012, 15:01


comments powered by Disqus